होडावडा हळदणकरवाडी ग्रामस्थ्यांची अनेक वर्षांपासून मागणी पूर्ण : रस्ता कामाचे भूमिपूजन

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नामुळे काम मंजूर

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा हळदणकरवाडी रस्ता खडिकरण डांबरीकरणासाठी शासनाच्या डोंगरी विकास निधी व नागरी जनसुविधा योजने अंतर्गत रुपये २३ लाख रुपये निधी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंजूर करून दिल्याबद्दल होडावडा गावाच्या वतीने आभार व्यक्त केले. हा निधी मंजूर करण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी विशेष प्रयत्न केले. या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम भाजपा मंडळ अध्यक्ष विष्णू परब, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती श्री प्रितेश राऊळ, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती श्री शंकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री मनीष दळवी यांचे हस्ते पार पडला.

जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी होडावडा गावातील ट्रान्सफर्मर, रस्ते, शाळा दुरुस्तीव कंपाउंड वॉल , बंधारे, अंगणवाडी दुरुस्ती,अशा वीविध विकास कामासाठी सुमारे १ कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल उपासरपंच राजबा सावंत यांनी आभार व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद दळवी, अनन्या धावडे, शैलजा साळगावकर, संदीप सातार्डेकर, भाजप चिटणीस नितीन चव्हाण, अण्णा वजराटकर,प्रकाश परब,तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर नाईक, माजी सरपंच दिगंबर दळवी, सोसायटी संचालक विजय होंडावडेकर, राघोबा दळवी, माजी चेअरमन चंद्रकांत दळवी, तलवडा सदस्य दादा परब, होडावडा भाजप बूथ अध्यक्ष प्रसाद परब, शिरीष साळगावकर भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.