बिंदू चौकात डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या ११ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर:भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे उभारण्यात आलेल्या ११ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. १३ एप्रिल ३०२६ रोजी रात्री नऊ वाजता पार पडलेल्या सोहळ्यास भीम अनुयायांची मोठी गर्दी झाली होती.कोल्हापूर शहरात प्रथमच बिंदू येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच जयभीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे बिंदू चौक परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.रोषणाई,फटाक्यांची आतषबाजी, आणि घोषणांनी परिसर भारावून गेला.बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार व समाजात समता-बंधुता निर्माण करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमाचे संयोजन श्री.विकी कांबळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित भीम अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांच्या विचारानुसार समाजकार्य करण्याचा निर्णय व्यक्त केला.