डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो समोर कॅण्डल लावणारे लोकं तयार नाही करायचे आहेत तर प्रबोधनातून जीवंत बाबासाहेब घराघरात आम्हाला तयार करायचे आहेत तर आणि तरच बहूजनांच्या घरापर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहोचेल असे परखड मत अॅड.रोशन पाटील यांनी व्यक्त केले.देवगड येथील संविधानीक विचार मंचाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जंयती देवगड तहसिलदार यांच्या सांस्कृतिक मंचावर आयोजित करण्यात आली होती. या जयंतीचे औचित्य साधून संविधान समजून घेताना या विषयीचे प्रबोधन व्याख्याते अॅड.रोशन पाटील यांनी केले.
व्याख्याते पाटील यांनी उपस्थित बहूजनांना संबोधित करताना सांगितले की, केवळ बुध्द वंदना घेऊन, पंचशील म्हणून बाबासाहेबांचे विचार घराघरात जाणार नाहीत, तर त्यांचे विचार जर पुढे आणायचे असतील तर बाबासाहेबांसारखी पोरं घरात तयार करावी लागतील आणि त्याची जबाबदारी इथल्या बसलेल्या सर्व लोकांची आहे. आज आम्हाला काय सांगितलं जातं की, बाबासाहेब दलितांचे कैवारी, ओबीसी ,मराठा ,शिंपी काय म्हणतो दलितांचे कैवारी परंतू हे धादांत खोट आहे. बाबासाहेब केवळ दलितांचे कैवारी नाहीत तर बाबासाहेबांनी भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी मलभूत हक्क आणि अधिकार संविधानातून दिलेले आहेत. असे असताना प्राथमिक शाळेच्या पहिलीच्या वर्गापासून ते बारावीच्या वर्गापर्यंत बाबासाहेब हे दलितांचे कैवारी आहेत असंच शिकवलं जातं हे अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. यामुळे बाबासाहेब इतर समाजाला बाबासाहेब समजून घ्यायचा वेळ लागला आहे.
या जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून देवगड तहसिलदार रमेश पवार, सभापती गणेश राणे,उपसभापती अमोल लोके,जि.प सदस्य देवा कदम, पं.स.सदस्या सलोनी तळवडेकर,स्नेहा अनभवणे, नगर पंचायच देवगड पाणी पुरवठा सभापती तन्वी चांदोसकर, नगर सेवक संतोष तारी, मिळून सारे देवगडचे अध्यक्ष श्री.हिदळेकर, पत्रकार संतोष कुळकर्णी, अनिस अध्यक्ष प्रमोद नलावडे,प्रधान सचिव माधुरी आकाश तांबे, सचिन सुरेंद्र चव्हाण यांचा संविधान विचार मंचाचे स्मृती चिन्ह,शाल व गुलाबपूष्प देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी सभापती गणेश राणे, तहसिलदार रमेश पवार, उपसभापती अमोल लोके,तन्वी चांदोसकर, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमावेळी अॅड.साळवे, डॉ. प्रा. निलेश वानखेडे, अध्यक्ष के.एस.कदम, सचिव दिलीप कदम,उपाध्यक्ष एम.के.जाधव,पी.वाय.कांबळे,संजय कांबळे,सुर्यकांत साळूंखे,सुरभी पुरळकर, आदी प्रमूख पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता अध्यक्ष के.एस. कदम यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुर्यकांत साळूंखे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.प्रदिप कदम यांनी केले व आभार प्रदर्शन आकाश तांबे यांनी केले.













