कळंबुशीत शेकडो भाविकांनी घेतले स्वामींच्या पालखीचे दर्शन

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन नजीक कळंबुशी गावात,स्वामींच्या पादुकांची पालखी आली असता शेकडो भाविकांनी दर्शन घेतले.
गावखडी ते अक्कलकोट अशी पदयात्रा करणारी स्वामी पादुकांची पालखी कळंबुशी येथे आली होती.यावेळी आरती,भजन व ,महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान ह्या पालखी सोहळ्यावेळी भाविक उपस्थित राहिल्याने शाम चव्हाण व बंधू यांनी आभार मानले.