पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरीची विद्यार्थिनी कु. फलक टेमकर हिच्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये!!

रत्नागिरी : 
पोदार इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी ईयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कु.फलक मुझम्मील टेमकर हिने ३ मिनिटांत सर्वाधिक हुला हूप फिरवण्याचा अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करून इतिहास रचला आहे.
पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी येथे पहिलीत शिकणाऱ्या फलकला लहान वयातच स्वतःहून हुला हूपिंगची आवड निर्माण झाली. कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता तिने सातत्याने सराव करून आपली कौशल्ये विकसित केली. सुमारे तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर तिने २२ नोव्हेंबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या हा विक्रम प्रस्थापित केला. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती आणि सर्व पुरावे सादर केल्यानंतर १० एप्रिल २०२६ रोजी तिच्या विक्रमाला अधिकृत मान्यता मिळाली
हे विलक्षण यश तिच्या अखंड मेहनतीचा, समर्पणाचा, अविरत सरावाचा आणि आत्मविश्वासाचा उत्कृष्ट नमुना आहे. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही लक्ष्य अशक्य नाही हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.

फलकने केवळ स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण पोदार परिवाराचे नाव उज्ज्वल केले आहे.केवळ पाच वर्षांची हि मुलगी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान झाली आहे. जेव्हा प्रतिभा आणि मेहनत एकत्र येतात, तेव्हा वय कधीच अडथळा नसतो.
पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरीच्या संपूर्ण परिवारातर्फे तसेच व्यवस्थापन, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी तिच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.