रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेडचा दहावीला 100% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

खेड (प्रतिनिधी) – दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी जाहीर झालेल्या सी. बी. एस. ई. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेडने पुन्हा एकदा 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील या निकालात विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी करत शाळेचा लौकिक अधिक उंचावला आहे.

या परीक्षेत कु. स्वरा महाडिक हिने 98.20 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. कु. गार्गी आग्रे, कु. अवनिश जगताप आणि कु. श्राव्य निकम यांनी प्रत्येकी 98 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच कु. आर्या खेडेकर आणि कु. अनिश मणकापुरे यांनी 97.80 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.

या निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले पैकीच्या पैकी गुण. आय. टी. विषयात 20 विद्यार्थ्यांनी, मराठी विषयात 9 विद्यार्थ्यांनी, कला विषयात 4 विद्यार्थ्यांनी तर संस्कृत विषयात 1 विद्यार्थ्याने 100 पैकी 100 गुण मिळवत उत्कृष्ट यश नोंदवले आहे.

95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 32 विद्यार्थ्यांमध्ये कु. अनुष्का वारे, कु. ओम सुर्वे, कु. आर्या दळवी, कु. वेद कालेकर, कु. स्नेहा दिवेकर, कु. स्मित चिखले, कु. शिवप्रसाद वाघ, कु. ईशा, कु. हादी मुकादम, कु. वेद गायकर, कु. शिवतेज लठ्ठे, कु. रुद्र हेळगावकर, कु. शाल्मली पवार, कु. गुफरान नाडकर, कु. तनिष्का भैरवकर, उत्कर्ष राठोड, कु. आराध्य दरेकर, कु. रुद्र शिगवण, निल बारटक्के, कु. लावण्या पाटोळे, कु. निधी साळवी, कु. आर्यन निर्मळ, कु. अथर्व टिकेकर, कु. स्वरा पवार, कु. आर्यन नदाफ आणि कु. साक्षी मोहिते यांचा समावेश आहे.
एकूण 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 38 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 49 विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. तसेच 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे 18 विद्यार्थी आणि 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे 8 विद्यार्थी यांचाही निकाल समाधानकारक ठरला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे विषय शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असून त्यांच्या परिश्रमांचे फळ या निकालातून दिसून येत आहे. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.