माखजन येथे संत गोरा कुंभार पुण्यतिथी साजरी

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन कुंभारवाडी क्रमांक २ येथे श्री संत गोरोबाकाका पुण्यतिथी विविध कार्यक्रमानी साजरी झाली.
यानिमित्त हरिपाठ,स्थानिक महिलांचे भजन,काकड आरती,महिलांसाठी हळदी कुंकू,श्री सत्यनारायणाची पूजा,व कीर्तने झाली.
यावेळी बुरंबाड येथील कीर्तकार सचिन बुवा साठे यांचे पुण्यतिथी दिनी कीर्तन रंगले.प्रपंच सांभाळून परमार्थ कसा करावा,हा आदर्श संत गोरा कुंभार यांचे कडून घ्यावा असे नमूद केले.भक्तीत प्रामाणिकपणा असेल तर देव नेहमी सोबत असतो ही संत गोरा कुंभारांची शिकवण उपस्थिताना सांगताना त्यांनी अनेक दाखले दिले.
तर अन्य दिवशी चिपळूण खडपोली येथील.कीर्तनकार निलेशबुवा पवार,कोळकेवाडी चे प्रमोदबुवा राणे यांची सुश्राव्य कीर्तने झाली.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा झाला.अध्यक्ष तुकाराम करंजेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.