Breaking : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून धडक

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात शुक्रवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला भरधाव कंटेनर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कार महामार्गावरून खाली गेली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
दोन्ही वाहने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना कार क्रमांक UP 14 ER 3729 भोस्ते घाटातील ब्लाइंड स्पॉटवरून पुढे जात होती. यावेळी भरधाव वेगात आलेल्या कंटेनर क्रमांक HR 55 AF 1736 च्या चालकाने कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे कार महामार्गावरून खाली गेली असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि खेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी पोलिसांनी आवश्यक कार्यवाही केली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.