सदगुरू गावडेकाका महाराज निक्षय मित्र पुरस्काराने सन्मानित

मसुरे | झुंजार पेडणेकर :श्री श्री 108 महंत मठाधीष प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज संस्थापीत श्री सदगुरू भक्त सेवा न्यास, रजी. माड्याचीवाडी या संस्थेने सामाजीक बांधीलकी जपत 2023 पासुन भारत सरकारच्या निक्षय भारत योजनेत सहभागी होऊन 2023,2024,2025 सतत 3 वर्षे 70 क्षयरोग रूग्णाना प्रोटीन यूक्त आहार सदगुरूच्या संकल्पनेतून व दातृत्व भावनेतून देण्यात आला. या सदगुरूच्या दातृत्व कार्याची भारत सरकारने दखल घेऊन त्यांच्या वाढदिवस दिवशी सदगुरूना निक्षय मित्र प्रमाणपत्र देऊन अधिका-यानी सन्मानीत केले. यावेळी जिल्हा क्षयरोग परीक्षक श्री लक्ष्मण कदम, श्री धिरज मोरजकर, प्रथमेश ओटवणेकर,नितीन नाईक, तेजस खानोलकर तसेच संस्था पदाधिकारी उपस्थित होते.