मंडणगड आगाराचे गलथान कारभाराचे विरोधात स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा रिपाइं (आठवले गट) चा इशारा 

मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड आगाराचे गलथान कारभाराचे विरोधात स्वातंत्र्य दिनी उपोषण कऱण्याचा इशारा रिपब्लिकीन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने देण्यात आला आहे. या विषया संदर्भात 1 ऑगस्ट 2023 रोजी तहसिल कार्यालयात मंडणगड यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनातील माहीतीनुसार मंडणगड तालुक्यातील गावागावात जाणाऱ्या एस.टी. बसमधून तालुक्यातील विद्यार्थी, वृध्द तसेच नागरीक तालुक्याचे ठिकठीकाणी येऊन आपआपली कामे करीत असतात. पंरतू आगारच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील सर्वांनाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत मंडणगड एस.टी. आगार व्यवस्थापक यांना वेळोवेळी भेटून व समस्या संदर्भात चर्चा करुन गलथान कारभारात सुधारणा करण्याबाबत कळविले आहे. पंरतू या कारभारत कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. त्यामुळे गलथान कराभाराचे विरोधात आम्ही 15 ऑगस्ट 2023 रोजी उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, जिल्हा संघटक विजय खैरे

तालुका अध्यक्ष नागसेन तांबे, सरचिटणीस रामदास खैरे, जिल्हा सदस्य किरण पवार, युवक अध्यक्ष संकेत तांबे, विरेंद्र जाधव, संकेश कासारे, अतुल कासारे, जितेंद्र जाधव, विधान पवार, योगेश कासारे, आदींच्या सह्या आहेत.

फोटो ओळी- मंडणगड तहसिल कार्यालयात निवेदन सादर करताना रिपाइं (आठवले गट) चे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, जिल्हा संघटक विजय खैरे व कार्यकर्ते.