मसुरे | झुंजार पेडणेकर
मालवण तालुक्यातील मालोंड मुस्लिमवाडा येथील आकाश मनबोध मुंडा (वय १५) हा अल्पवयीन मुलगा १५ ऑक्टोबर २०२६ रोजी बेपत्ता झाला आहे. अज्ञात इसमाने फूस लावून त्याला पळवून नेल्याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास मोबाईल क्रमांक ९७६५०५९६७० वर किंवा मालवण पोलीस ठाणे / पोलीस दूरक्षेत्र मसुरे येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.













