सावंतवाडी । प्रतिनिधी :वैश्यवाडा सावंतवाडी येथील रहिवासी अनंत वामन सुकी उर्फ बाबी सुकी (वय ८९) यांचे सोमवारी, १० ऑगस्ट रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. वैश्यवाडा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते बंड्या सुकी यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वैश्यवाडा व सावंतवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली, जावई, एक मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून सुकी कुटुंबीयांचे सांत्वन केले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.












