सिंधुदुर्ग जिल्हा बँक शिरगांव शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर

१ मे रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन”

शिरगाव (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरगाव शाखेच्या स्वमालकीच्या नूतन इमारतीत स्थलांतर सोहळा शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सुधीर साटम यांच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या या नव्या वास्तूचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून माजी आमदार अजित गोगटे, बँक संचालक प्रकाश बोडस, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, शिरगाव पंचायत समिती सदस्या शीतल तावडे, तळवडे पंचायत समिती सदस्या सलोनी तळवडेकर तसेच विविध सेवा सोसायट्यांचे चेअरमन — विश्राम लोके (शिरगाव), सत्यवान सावंत (साळशी), रामचंद्र राणे (हडपीड), अरविंद पवार (तोरसोळे), सुरेश राणे (महाळुंगे नाद), सदानंद देसाई (तळेबाजार), सुभाष नार्वेकर (कुवळे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदर सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे प्रभारी मुख्य कार्य अधिकारी दिवाकर देसाई यांनी केले आहे.