तीन ट्रक जप्त लाखोंचा दंड वसूल…
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी :तालुक्यातील दुर्गमानवड व तळगाव-पिरळ मार्गावर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर महसूल विभागाने धडक कारवाई करत तीन ट्रक जप्त केले. या कारवाईत संबंधितांकडून लाखो रुपयांचा दंड ही वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार श्रीमती.अनिता देशमुख यांनी दिला.
दुर्गम आवड परिसरात अवैध उत्खननाचा तक्रारी सातत्याने येत असल्याने महसूल विभागाने विशेष गस्त मोहीम राबवली. दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा करण्यात आलेल्या गस्तीदरम्यान अंधाराचा फायदा घेत सुरू असलेली बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आली.
तात्काळ कारवाई करत तीन ट्रक ताब्यात घेण्यात आले. आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत मंडळ अधिकारी गीते, कोरे तसेच तलाठी शेणवी यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या समन्वयामुळे ही कारवाई यशस्वीपणे पार पडली. उत्खनन रोखण्यासाठी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची गरज असल्याचे तहसीलदार अनिता देशमुख यांनी नमुद केले.उत्खनन व वाहतुकी विरोधात पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील असा इशाराही यावेळी तहसीलदार निंबाळकर यांनी दिला.











