कामगार दिन व स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा
निधी वाढवून विकासाला गती देण्याचा निर्धार
देवगड : कामगार दिन व स्थापना दिनानिमित्त देवगड पंचायत समितीला भेट देत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी पंचायत समितीला अधिक सक्षम करण्यावर भर दिला. सध्याचा निधी अपुरा असून तो वाढवण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समितीला बळकटी देणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी आधुनिक इमारत उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. नागरिकांची कामे प्राधान्याने पूर्ण करून पारदर्शक प्रशासन देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी चव्हाण व अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गुणवंत कर्मचारी विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त कर्मचारी तसेच त्यांचे पाल्य व नातेवाईक यांचा सत्कार यावेळी करण्यात आला .
–












