अणसूर ग्रामपंचायत ने गावात एकाच दिवसात बांधले ५ वनराई बंधारे..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
दुष्काळ सदृश परिस्थिती मध्ये पाणी जिरवा, भुजल पातळी वाढवण्यासाठी व पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी, पाणी टंचाई भासू नये म्हणून अणसूर ग्रामपंचायत ने वनराई बंधारे बांधण्यासाठी कंबर कसली. आज संपूर्ण दिवस अणसूर कार्यक्षेत्रात ५ ठिकाणी बंधारे घालण्यात आले.

दिवसभर अणसूर ग्रामपंचायत च्या वतीने व बहर ग्रामसंघ, अणसूर हायस्कुल, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामस्थ, शेतकरी भाजपा पदाधिकारी ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
दुष्काळ सदृश परिस्थितीचे गांभीर्य गावातील ग्रामस्थांनी ओळखून सर्वांनीच या उपक्रमा मध्ये मोठया उत्सहाने सहभाग दर्शवीला. आणि लोकसहभागातून बंधारे घालण्यात आले. यात महिला वर्ग व जेष्ठ नागरिक महिला भर उन्हात काम करत होत्या. येत्या काळात अजूनही पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोठया प्रमाणात लोकचळवळ उभी करून मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे व जल तारा खड्डे करण्यात येतील असा निर्धार अणसूर ग्रामपंचायत च्या वतीने अणसूर सरपंच सत्यविजय गावडे यांनी केला आहे.