रामपुरुष युवा मित्रमंडळाचे आयोजन : सर्वच मान्यवरांकडून मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक
वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिरोडा येथे रामपुरुष युवा मित्रमंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ८२ रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजसेवेत आपला सहभाग नोंदविला. रामपुरुष युवा मित्रमंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
शिरोडा येथे उपजिल्हा रुग्णालयात हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. एकूण १०१ रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदऊन ८२ सक्रिय रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे रामपुरुष युवा मित्र मंडळातर्फे आभार मानण्यात आले.
या रक्तदान शिबिराला माजी आमदार शंकर कांबळी, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सदस्य योगिता सिद्धेश परब. तंटा मुक्ती अध्यक्ष सिद्धेश उर्फ भाई परब, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, माजी सरपंच मनोज उगवेकर, भाजप तालुका अध्यक्ष पप्पू परब, शिरोडा ग्रा.प. सदस्य मयुरेश शिरोडकर, पांडुरंग नाईक, राजन धानजी, प्रथमेश परब, माजी उपसरपंच दत्तगुरु परब, माजी सदस्य कौशिक परब, सामाजिक कार्यकर्ते बाबल गावडे आदींसह पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.













