ओटवणे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. रेश्मा नाईक बनली महाराष्ट्र पोलीस.

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावची सुकन्या आणि महेंद्रा अकॅडमी ची विध्यार्थिनी रेश्मा नाईक ही पहिल्या प्रयत्नात पोलीस दलात भरती झाली असून मीरा भाईंदर पोलीस म्हणून तिची निवड झाली आहे. रेश्मा हिची परिस्थिती मध्यमवर्गीय वडील गवंडी कारागीर आणि आई गृहिणी.पण रेश्मा हिच्या ध्येय्यासमोर,शिक्षणात कसलाच अडथळा आणु दिला नाही आई वडिलांच्या कष्टाचे रेश्माने चीज केल.ओटवणे सारखं ग्रामीण गाव आणि तिथून स्वप्न घेण्यासाठी भरारी घ्यायची तर ठासून भरलेल्या गुणवत्तेला जोड हवी होती अकॅडमी ची आणि प्रशिक्षित हुशार मार्गदर्शकाची आणि हीच भूमिका बजावली अधिकाऱ्यांचा जिल्हा बनविण्यासाठी धडपडणाऱ्या महेंद्र अकॅडमीने.तिच्या गुणवत्तेला हेरून योग्य मार्गदर्शन करत तिच्याकडून सातत्याने मेहनत करून घेतली आणि तिच्या भरारी घेण्यासाठी सज्ज पंखाना गगन भरारी घेण्याचं बळ दिल . मनात जिद्ध आणि नजरेत स्वप्न घेत मैदानात उतरली आणि उगड्या डोळ्यांनी पाहिलेल स्वप्न कठोर मेहनतीने अखेर सत्यात उतरवीलं.रेश्मा हिने दहावी मध्ये ओटवणे रवळनाथ विद्यामंदीर मधून ९१% गुण मिळवत हायस्कूल मधून द्वितीय क्रमांक मिळवीला त्यानंतर आर. पी. डी. कॉलेज मध्ये विज्ञान शाखेत ६२% मिळविले सध्या एस. पी. के. कॉलेज मध्ये एफ. वाय. बी. एस. सी. ला पण ८० टक्के गुण मिळविले त्यामुळे पोलीस भरतीमध्ये प्रश्न लेखी परीक्षेचा नव्हताच,त्यात तिचा हातखंडा होताच. प्रश्न होता मैदानात मिळणाऱ्या गुणांचा. मात्र इथही तिने मैदान मारलच आणि मैदानात 50 पैकी 43 गुण मिळविले आणि पहिली पायरी सहज गाठली. त्यानंतर लेखी परीक्षेत १०० पैकी ७७ गुण मिळवीत १५० पैकी १२० हा माईल स्टोन तीन गाठला.प्रचंड मेहनत इच्छा शक्ती,नियोजन पद्धतीने अभ्यास याच्या जोरावर तीन हे यश मिळवील.तिची यात प्रचंड मेहनत असली तरी त्याचे श्रेय ती आपल्या आईवडिलांना,गुरूजनांना आणि महेंद्रा अकॅडमी च्या सर्व टीमला देते.आज रेश्मा हिच्या यशाने इतर मुलांनाही प्रेरणा मिळाली असून भविष्यात अनेक युवक युवती या पोलीस दलात दाखल होतील असा विश्वास व्यक्त होत आहे.रेश्मा हिच्यासह तिच्या वडिलांचे, महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी चे अभिनंदन करण्यात येत आहे.