मलकापुरात सख्ख्या भावाकडून सख्ख्या भावाची निर्घुण हत्या…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगर परिषदेच्या पाठीमागे सुरू असलेल्या एका नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी मध्यरात्री सख्या भावानेच आपल्या सख्या भावाची हत्या केल्याची खळबळजळत घटना घडली आहे.या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत नरेंद्र इतवारी सिधर (वय ३५) आणि आरोपी नरेंद्र इतवारी सिधर हे दोघे सख्खे भाऊ असून ते मूळचे छत्तीसगड (मेमरा राज्य) येथील रहिवासी आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी हे दोन्ही भाऊ मलकापूर परिसरात बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करत होते. सध्या ते नगर परिषदेच्या मागील बाजूस असलेल्या एका नवीन इमारतीच्या बांधकाम स्थळी वास्तव्यास होते.

काल मध्यरात्रीच्या सुमारास या दोन्ही भावांमध्ये काहीतरी कारणावरून जोरदार वादावादी झाले.या वादाचा राग अनावर झाल्याने आरोपी धरेंद्र सिधर याने तेथेच पडलेली फरशी, प्लास्टिक पाईप आणि गिलावा करण्यासाठी वापरण्यात येणारे ॲल्युमिनियमची पट्टी या हत्याराणी नरेंद्र याच्यावर भीषण हल्ला केला. आरोपीने नरेंद्रच्या तोंडावर डोळ्यावर, कपाळावर आणि हातापायांवर वर्मी घाव घातले. या गंभीर मारहाणीत नरेंद्रचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी धरेंद्र घटनास्थळावरून फरार झाला आहे.

घटनेची माहिती मिळतात शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत आणि आरोपी हे परराज्यातील मजूर असून ते गेल्या काही काळापासून येथे कामाला आहेत.

या प्रकरणी फिर्याद दाखल झाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आली आहेत.
एका सख्ख्या भावानेच सख्या भावाचा अशाप्रकारे क्रूर अंतर केल्याने मलकापूर परिसरात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले आहे

पुढील तपास शाहुवाडी पोलीस करत आहोत.