ओरोस पुलावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; 8.48 लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गनगरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत गोवा-मुंबई महामार्गावरील ओरोस पुलाजवळ दोन आरोपींना ताब्यात घेत 8 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत अमर रमेश गायकवाड (वय 30, रा. दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि आनंद बाबुराव कोकरे (वय 30, रा. देलवडी, ता. दौंड, जि. पुणे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई दि. 2 मे 2026 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ओरोस ब्रिज, गोवा-मुंबई मार्गावर करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 7 लाख रुपये किमतीची टोयोटा ग्लांझा कार तसेच 1 लाख 48 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू असा एकूण 8 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सूरज पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक नाईक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड तसेच पोलीस हवालदार विल्सन डिसोजा व एडवर्ड बुथेलो यांच्या पथकाने ही कारवाई केली.

याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.