मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती मंदिराचा २० वा वर्धापनदिन ०४ मे व ०५ मे २०२६ रोजी साजरा करण्यात येत आहे. ०४ मे २०२६
सकाळी ०८.०० वा.श्री महागणपती पूजा व अभिषेक, सकाळी ०९.३०श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० ते ०१.०० महाआरती व तिर्थप्रसाद,दुपारी १.०० ते ३.०० वा.महाप्रसाद,
रात्रौ. ९.३० नंतर बाळा सावंत दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग.
०५ मे रोजी सकाळी ०८.०० वा.श्री महागणपती पूजा व अभिषेक, सकाळी ०९.०० ते १२.००वा.
सामुदायिक एकादशणी सोहळा, सायं. ०९.०० ते १०.०० वा. पंचक्रोशीतील सुश्राव्य भजने. या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.












