शिरगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या परीक्षेत शिरगाव हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, शिरगावचा एकूण निकाल ९९.३३ टक्के लागला आहे.
कला शाखेतून ४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या शाखेचा निकाल ९७.९१ टक्के लागला. या शाखेत भूषण कदम (६६.६७%), तन्वी मिठबावकर (६१%) व ममता जाधव (५८.१७%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
तसेच वाणिज्य शाखेत १०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या शाखेचा १०० टक्के निकाल लागला. या शाखेत दुर्गेश चव्हाण (७६.६७%), विराज पवार (७४.१७%) व नचिकेत चव्हाण (७२.३३%) यांनी यश मिळवले.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, संस्था पदाधिकारी व संचालक, मुख्याध्यापक एस. एन. अत्तार, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.












