सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत केंद्रशाळा सुरंगपाणीचे घवघवीत यश

 

सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला आहे .

या परीक्षेत कुमार गौरांग मिलिंद पंडीत (इयत्ता ३री) याने सिल्व्हर मेडल, कुमार रोशन सोमकांत कावले (इयत्ता ३री) याने ब्रॉन्झ मेडल तर कुमारी धृवा सत्यब्रम्ह पंडित (इयत्ता ६ वी) हिने ब्रॉन्झ मेडल प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या यशाबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांसह परीक्षेत सहभागी झालेल्या इतर सर्व प्रविष्ट विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीम. शामल मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.