मसुरे देऊळवाडा येथील श्री कमरादेवीचा त्रैवार्षिक उत्सव ९ मे रोजी!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे देऊळवाडा येथील श्री कमरादेवीचा त्रैवार्षिक उत्सव ९ मे २०२६ रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा श्री कमरादेवी मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. यनिमित्त आयोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत.

०६ मे रोजी भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा. ०८ मे रोजी दु. ३.०० वा. स्थानिक महिलांसाठी कार्यक्रम, रात्रौ ९.०० वा. : स्थानिक मुलांचे रेकार्ड डान्स खास आर्कषक स्वामी महिमा,

०९ मे रोजी सकाळी ९.०० वा. कमरादेवीच्या ओट्या भरणे,दुपारी २.०० वा. : श्री सत्यनारायण महापूजा,

सायं. ५.०० वा. : स्थानिक ग्रामस्थांची भजने, रात्रौ ९.०० वा. : बक्षीस वितरण समारंभ, रात्रौ. १०.०० वा. सिंधुकन्या प्रस्तूत प्रणाली कासले निर्मित लावण्यखणी ही कार्यक्रम आणि हिंदी-मराठी नृत्य गीतांचा सुरेल नजराना.

उपस्थितीचे आवाहन

श्री कमरादेवी सुतार समाज मंडळस्थानिक कार्यकारीणी व मुंबई

कार्यकारीणी व देऊळवाडा ग्रामस्थ यानी केले आहे.