जि प सदस्या विनिता विनय गांगण यांचा पुढाकार
लांजा (प्रतिनिधी) विविध शासकीय योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ मिळण्याच्या दृष्टीने जि.प. सदस्या सौ.विनिता विनय गांगण यांच्या माध्यमातून भांबेड जिल्हा परिषद गटात दिनांक ५ ते १४ मे या कालावधीत मोफत सरकारी योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ आज मंगळवारी भांबेड गणपती मंदिर या ठिकाणी करण्यात आला.

विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करताना सर्वसामान्य जनता हैराण होते. म्हणूनच आमदार किरण सामंत यांच्या संकल्पनेनुसार भांबेड जि प सदस्य सौ .विनिता विनय गांगण यांच्या पुढाकाराने संपूर्ण जि प गटातील विविध गावांमध्ये मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये उद्या बुधवार दिनांक ६ मे रोजी प्रभानवल्ली- खोरनिनको या गावांसाठी शिबिर वाघजाई मंदिर या ठिकाणी सकाळी १० वाजता होणार आहे. दिनांक ७ मे रोजी कोंडगे रिंगणे कुरंग या गावांचे शिबिर सकाळी १० वाजता रामेश्वर विद्यालय कोंडगे येथे, ११ मे रोजी केळवली कोल्हेवाडी यांचे शिबिर साल्पे शाळा नं. २ या ठिकाणी होणार आहे. दिनांक १२ मे रोजी धावडेवाडी माचाळ भोजवाडी यांच्यासाठी शिबिर सकाळी दहा वाजता पांडुरंग पाटील यांच्या घरी होणार आहे. दिनांक १३ रोजी सकाळी १० वाजता बौद्धवाडी सालपे तर दुपारी दोन वाजता कोचरी विठ्ठल मंदिर या ठिकाणी शिबिर पार पडणार आहे.
दिनांक १४ मे रोजी आरगाव आणि व्हेळ या गावांसाठी सकाळी दहा वाजता वेळ शाळा नंबर एक या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर होणार आहे . या शिबिरात आधार कार्ड नवीन आणि दुरुस्ती करणे, मतदान कार्ड नवीन आणि दुरुस्ती करणे, आभा कार्ड आयुष्यमान कार्ड काढणे, ई श्रम योजना नोंदणी, पॅन कार्ड, कामगार कल्याण योजना, लाडकी बहीण योजना केवायसी ही सर्व कामे मोफत करून दिली जाणार आहेत.
दरम्यान आज मंगळवारी भांबेड गणपती मंदिर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाचा २९९ लोकांनी लाभ घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विनिता गांगण उपसभापती आदेश आंबोळकर, पंचायत समिती सदस्य दादा पत्की, विभाग प्रमुख प्रमोद गुरव, शाखाप्रमुख प्रमुख धनlवडे, विनय गांगण राजू गांधी, पांडुरंग धनावडे, राहुल नारकर, शिवसेना महिला पदाधिकारी प्रियांका रसाळ, मानसी बेर्डे, सोनिया गांधी आदी उपस्थित होते.
दरम्यान, उद्यापासून होणाऱ्या सर्व ठिकाणी ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या सर्व मोफत योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य विनिता विनय गांगण यांनी केले आहेत













