मंडणगड | प्रतिनिधी : तहसिल कार्यालय मंडणगड यांच्यावतीने 1 ते 7 ऑगस्ट 2023 या सात दिवसांचे कालावधीत तालुक्यात राबविण्यात आलेल्या महसुल सप्ताहातील विविध लोकाभिमुख उपक्रमांचे तालुकावासीयांकडून कौतूक करण्यात आले. (7) ऑगस्ट 2023 रोजी तहसिलदार तानाजी शेजाळ यांच्या उपस्थितीत महसुल सप्ताह सांगता समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी विशाल जाधव, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया घोडके, माजी. जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे, वनअधिकारी अनिल दळवी यांच्यासह सर्व खात्याचे अधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावीक मंडळ अधिकारी निलेश गोडघासे यांनी सप्ताहात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहीती देत नागरीकांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विविध सुविधांबद्दल भाष्य केले. यावेळी ऱघुनाथ पोस्टुरे, संतोष गोवळे, सचिन माळी, शब्बीर मांडलेकर, आदेश मर्चंडे, विजय खैरे, अनंत केंद्रे, विश्वनाथ टक्के, यांनी नागरीकांना होणाऱ्या विविध गैरसोईंबाबत तहसिलदारांचे लक्ष वेधून विविध सुचना मांडल्या तसेच या महसुल सप्ताहाच्या कार्यक्रमाचे कौतूक करीत प्रशासनाच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली. कार्यक्रमाचा समारोप करताना तहसिलदार तानाजी शेजाळ यांनी नागरीकांकडून आलेल्या सुचनांवर मार्गदर्शन करताना सातबारा, ई पिक पाहणी, रेशन कार्ड, सेतू संबंधीत विविध दाखले याची ऑनलाईन प्रक्रीयेची माहीती देत शंकाचे निरसन केले व आगामी काळात तालुक्याचे महसुल प्रशासन अधिकाधीक लोकाभीमुख होण्यासाठी सर्व प्रशासन कार्यरत राहणार असल्याचे नागरीकांना आश्वास्त केले या कार्यक्रमास राजकी सामाजीक शैक्षणीक, क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दापोलीचे प्रांतअधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ. अजीत थोरबोल यांच्या उपस्थित तोंडली येथे झालेला कार्यक्रमात माजी सैनिकांशी संवादाचा कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला, नैसर्गीक आपत्तीना ग्रस्त झालेल्या तालुक्यात सतरा कुटुंबाना महसुल विभागाने सप्ताहात मिळवून दिलेली मदत, व निवृत्त महसूल कर्मचाऱ्यांशी साधण्यात आलेला संवाद कौतूकाचा विषय ठरला.
फोटो ओळी- महसुल सप्ताहाचे सांगता समारोहाचा अध्यक्षीय समारोप करताना तहसिलदार तानाजी शेजाळ, नागरीकांशी संवाद साधताना सोबत गटविकास अधिकारी विशाल जाधव, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया घोडके व अन्य.












