घरडा केमिकल्स सीएसआर उपक्रमांतर्गत सदगुरु काडसिद्धेश्वर विद्यालयात विद्यार्थाना मोफत वह्या वाटप

खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील गुणदे येथील सरस्वती शिक्षण संस्था गुणदे संस्थेच्या सदगुरु काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे व गुरुकुल विद्यामंदीर गुणदे या प्रशालेतील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या मुलांना घरडा केमिकल्सचे सीएसआर विभाग व्यवस्थापक दत्ताराम घाग व बापुराव पवार यांच्या उपस्थितीत मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. घरडा कंपनीचे प्रमुख पदमश्री डॉ. के. एच. घरडा यांच्या ‘सामाजिक कार्याद्वारे समाजाची सेवा ‘ या ध्येयानुसार घरडा सामाजिक बांधिलकी फंडातुन विद्यार्थाना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा आवाशी, शेल्डी, माणी, चिरणी, लोटेमाळ, पीरलोटे, असगणी, तलारी, घाणेखुंट या गावातुन गुणदे विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याना एकुण ७०० वह्यांचे वाटप करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ अश्विनी जोशी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या वह्या वाटप कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन विक्रांत आंब्रे व संचालक यांनी घरडा कंपनी व्यवस्थापन व प्रशालेचे माजी विद्यार्थी समीर आंब्रे यांच्या सहकार्याबाबत आभार मानले. या कार्यक्रमास प्रशालेचे उपशिक्षक पंडीत नागरगोजे, सतिश कदम, मनोज कासार यांचे सहकार्य लाभले.