परांजपे मोतीवाले हायस्कूलचा १०० टक्के निकाल

चिपळूण (प्रतिनिधी):-शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटी परांजपे मोतीवाले हायस्कूलचा दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे या परीक्षेसाठी ९४ विद्यार्थी बसले होते. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु. स्वराली सतीश मुणगेकर या विद्यार्थिनीने ९५.४०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. द्वितीय क्रमांक तनुश्री विजय गोरीवले ९४%, तर तृतीय क्रमांक कु. सिद्धी सुधाकर रेडीज हिने ८८.२०% गुण मिळवून यश संपादन केले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत देवळेकर, सचिव मल्लेश लकेश्री, संस्थेचे कार्याध्यक्ष राजन खेडेकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड व सर्व संस्थेचे पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक भाऊ कांबळे, पर्यवेक्षक श्री शिंदे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.