महामार्गावर कुडाळ येथे कंटेनरचा भीषण अपघात

कंटेनरची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ येथे आज संध्याकाळी ६.१५ मिनिटांच्या सुमारास गोव्याला जाणारा कंटेनर घसरून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या आहेत. तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. मात्र, दोन्ही महिला दैवबलवत्तर म्हणून वाचल्या आहेत. दोन्ही जखमींवर कुडाळ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, गोव्याकडे जाणारा कंटेनर (एम एच ०४ एन बी ९९९५) महामार्गावरील बजाज शोरूम येथे आला असता पावसामुळे निसरडा बनलेल्या ठिकाणी घसरून समोरून जाणाऱ्या दुचाकीवर (एम एच ०७ ए के ७०१७) धडकला. तर कंटेनरची चालक केबीन विरुद्ध बाजूस येऊन दुभाजकावर आदळली.