नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळात शिवसेनेची भव्य रिक्षा रॅली; आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भंगसाळ नदीला श्रीफळ अर्पण

कुडाळ (प्रतिनिधी):नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून कुडाळ शहरात शिवसेनेच्या वतीने भव्य रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीनंतर आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भंगसाळ नदीला भक्तिभावाने श्रीफळ अर्पण करण्यात आले.

गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त शहरातील भंगसाळ नदीला श्रीफळ अर्पण करण्याची परंपरा चालत आली आहे. या वर्षी तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी शहरातील सर्व रिक्षा व्यावसायिकांना एकत्र आणून आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य रॅलीचे आयोजन केले होते. पोस्ट कार्यालयापासून सुरू झालेली ही रिक्षा रॅली भंगसाळ नदीपर्यंत काढण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आणि रिक्षा व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार निलेश राणे यांनी स्वतः या रॅलीत सहभागी होऊन भंगसाळ नदीला नारळ अर्पण केला.

 

या प्रसंगी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर आणि शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.