लाईट आणि पाण्या अभावी लांजावासीय बेहाल, वादळाचा फटका 

अनेक तासापासून वीज गायब, नळ पाणी योजना ठप्प, लांजा वासियांचे हाल 

संतोष कोत्रे | लांजा-: शनिवारी सायंकाळी चार वाजता मुसळधार पावसाचा आलेल्या वादळा वादळाचा फटका महावितरण ला बसला असून अनेक ठिकाणी वीज वाहिन्या आणि वीज खांब मोडून पडल्याने गेल्या १२ तासापासून वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक बेहाल झाले असून लाईट अभावी लांजा नगरपंचायतीची नळ पाणी योजना ठप्प झाल्याने लांजा वासिया दुहेरी संकटात अडकले आहेत.

दरम्यान लाईट नसल्याने अनेक हॉटेल व्यवसायिक आणि आईस्क्रीम पार्लरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.

शनिवारी सायंकाळी विजांचा कडकडाट करत कोसळलेल्या मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाचा फटका लांजा शहरासह तालुक्याला बसला आहे. लांजा शहरात लांजा रेस्ट हाऊस, लांजा आग्रे हॉल, गंताडे हॉटेल जवळ , कोत्रेवाडी, कुंभारवाडी, भटवाडी लांजा, आगरगाव या ठिकाणी

झाडे पडून वीज वाहिन्या तुटल्या आहेत. तर गोंडेसखल गाव , कोत्रेवाडी, आगरगाव या ठिकाणी वीज खांब पडले आहेत.