लांजा साटवली रोड, लांजा जावडे रोड येथील वादळातील झाडे बाजूला करण्यात दिले योगदान
लांजा (प्रतिनिधी) वादळात झाडे मोडून पडल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने पडलेली झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी योगदान देत नगरसेवक योगेश कावतकर यांनी आदर्श लोकप्रतिनिधीचे उत्तम उदाहरण आपल्या कृतीतून दाखवून दिले.
शनिवारी सायंकाळी वादळामुळे लांजा जावडे रोड तसेच लांजा कोत्रे वाडी येथे साटवली रोड या ठिकाणी भले मोठे अकेशियाचे रुक्ष उनमळून पडल्याने रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. याबाबतची माहिती मिळतात प्रभाग क्रमांक सहा चे नगरसेवक योगेश कावतकर यांनी नगरपंचायत आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणी तात्काळ घाव घेतली . झाडांमुळे झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जेसीबीच्या सहाय्याने ही झाडे युद्ध पातळीवर हटवण्यात आली. आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्याचप्रमाणे वीज वाहिन्यांवर आणि खांबांवर झाडे पडल्याने महावितरणचे कर्मचारी तुषार कांबळे व अन्य त्याचप्रमाणे नगरपंचायत कर्मचारी, स्थानिक नागरिक मंगेश आंबेकर, विनीत आंबेकर, मयुरेश आंबेकर, विजय आंबेकर, अजित शिर्के यांच्या मदतीने ही झाडे बाजूला करण्यात यश आले.
नगरसेवक म्हणून योगेश कावतकर यांनी घटना घडल्यानंतर तत्परतेने जेसीबी मागवून आणि स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहत झाडे बाजूला करण्यात योगदान दिले. अशाप्रकारे योगेश कावतकर यांनी आपल्या कृतीतून कार्यतत्पर नगरसेवक कसा असावा याचे उत्तम उदाहरण घालून दिले.
याबद्दल नगरसेवक योगेश कावतकर यांचे लांजा कोत्रे वाडी तसेच जावडे रोड परिसरातील रहिवासी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.












