भेडशी येथे १७ मे रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मोफत औषधोपचार; अटल प्रतिष्ठान व बाबा टोपले मित्रमंडळाचा पुढाकार

दोडामार्ग: प्रतिनिधी

ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अटल प्रतिष्ठान आणि बाबा टोपले मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी भेडशी येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सदर शिबीर दिनांक रविवार, १७ मे २०२६ रोजी वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत स्थळ: श्री दामोदर हॉल, भेडशी खालचा बाजार येथे होणार आहे

 

या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात विविध क्षेत्रांतील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत डॉ. अभिजीत चितारी (फिजीशियन)डॉ. राजेश नवांगुळ (स्त्रीरोग तज्ज्ञ व टेस्ट ट्यूब बेबी स्पेशालिस्ट)डॉ. सौ. नेहा पावसकर-कोल्हे (नेत्ररोग तज्ज्ञ)डॉ. सागर कोल्हे (मूत्ररोग तज्ज्ञ)डॉ. संदीप सावंत (बालरोगतज्ज्ञ)

डॉ. निखील अवधूत (अस्थिरोग तज्ज्ञ)डॉ. अनिकेत वजराटकर (एम.एस. सर्जन)डॉ. विजय सुर्यवंशी (स्त्रीरोगतज्ज्ञ)डॉ. संजीव लिंगवत (होमिओपॅथी)या शिबिरात येणाऱ्या सर्व रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाईल व आवश्यक औषधोपचार मोफत दिले जातील. ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत गरज भासल्यास यशराज हॉस्पिटल (सावंतवाडी) आणि चितारी हॉस्पिटल येथे पुढील उपचार केले जातील.ज्या नागरिकांकडे ‘आयुष्यमान भारत’ कार्ड नाही, त्यांच्यासाठी शिबिरस्थळी कार्ड काढून देण्याची विशेष सुविधा उपलब्ध असेल.

“ग्रामीण भागातील जनतेने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, या शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली विविध तज्ज्ञांचा सल्ला मिळणार आहे. तरी भेडशी दशक्रोशीतील जास्तीत जास्त रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा.”

— अँड. नकुल पार्सेकर (अध्यक्ष, अटल प्रतिष्ठान) व श्री. दत्ताराम टोपले (बाबा टोपले मित्रमंडळ)

भेडशी आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या तक्रारींसाठी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.