तवसाळ बाबर वाडी येथे विविध कार्यक्रम उत्साहात

जि. प.सदस्य प्रमोद गांधी यांची प्रमुख उपस्थिती
गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील तवसाळ बाबळवाडी येथे बाबरवाडी विकास मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महिला मंडळ हळदीकुंकू महाप्रसाद रात्री सुस्वर भजन व बहुरंगी नमन असे विविध कार्यक्रम पार पडले.
यावेळी मनसेचे नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी तसेच मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी मुंबई अध्यक्ष अशोक जोशी, सचिव राजेश येद्रे, खजिनदार अरुण जोशी, ग्रामस्थ अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विजय नाचरे, खजिनदार सचिन येद्रे,दीपक जोशी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बाबरवाडी विकास मंडळ आणि महिला मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले.