खेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे सक्रिय शिलेदार संतोष काशीराम मोरे, प्रभाकर मुरलीधर कोळेकर आणि भिकू विठ्ठल जानकर यांना केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल शिक्षक समिती शाखा खेड परिवाराच्या वतीने नुकताच त्यांच्या निवासस्थानी जाऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक बांधवांनी त्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षण क्षेत्रात सातत्याने प्रामाणिकपणे कार्य करत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या या तिन्ही शिलेदारांच्या पदोन्नतीमुळे शिक्षक समिती परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी शिक्षक समिती शाखा खेडचे अध्यक्ष संतोष चव्हाण, शिक्षक पतपेढीचे चेअरमन सुनील दळवी, सचिव धर्मपाल तांबे, जिल्हा प्रतिनिधी राजेश भागणे, तालुका नेते बबन साळवी यांच्यासह शैलेश पराडकर, श्रीकृष्ण खांडेकर, अनिल यादव, नवनीत घडशी, तुकाराम काताळे, नरेश ठोंबरे, दिलीप यादव, दिनेश पवार, बबन मोरे, सतीश गजमल, शशिकांत भुवड, राजाराम दरेकर, सचिन गावडे आदी शिक्षक समितीचे शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.













