निकृष्ट कामांबाबत बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर संतप्त

गटारे काँक्रिटीकरण कामांच्या तपासणीचे आदेश 

नगरपरिषद सभागृहात केली संबंधित कामांची पोलखोल 

बांधकामांचा केला स्पॉट पंचनामा

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्तरावरून प्राप्त विकास निधीतून मालवण शहरात होणारे प्रत्येक विकास काम हे दर्जेदारच असले पाहिजे. निकृष्ट कामे खपवून घेतली जाणार नाहीत. असे स्पष्ट करतं शहरातील गटार काँक्रिटीकरण कामांची पोलखोल बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी मालवण नगरपरिषद सभेतच केली. संबंधित कामांच्या तपासणीचे आदेश ही देण्यात आले आहेत.

शासन स्तरावरून प्राप्त होणारा विकासनिधी जनहिताच्या दृष्टीने दर्जेदार कामांसाठीच खर्च झाला पाहिजे. निकृष्ट कामे होऊन निधी वाया जात असेल तर ते सहन केले जाणार नाही. अश्या कामांची तक्रार करून सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल. प्रसंगी प्रशासन अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात भुमिका घेतली जाईल. प्रसंगी लोकशाही मार्गाने उपोषण छेडू. अशी स्पष्ट भूमिका बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी मांडली.

दरम्यान, तक्रार प्राप्त सर्व कामांची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल. असे नगराध्यक्षा ममता वराडकर वं मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी सांगितले.

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी सभागृहात सांगितले. मेढा मार्गांवरील हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर पर्यंत गटार बांधकाम करणे. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. कामाच्या शुभारंभ प्रसंगी दर्जेदार कामाबाबत साईटवर नगरपरिषद जेई, ठेकेदार यांना सक्त सुचना दिल्या होत्या. बांधकाम सभापती म्हणून सुचना देताना इतर नगरसेवक होते. झालेल्या कामात वापरलेले स्टील, कॉकिट जाडी यांसह कामाबाबत आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. काम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही.

मालवण नगरपरिषद जेई यांनी नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगराध्यक्षा यांच्या उपस्थितीत कामाची तपासणी करून पंचयादी घालावी. यात हॉटेल आना नाना ते मुरलीधर मंदिर ते रघुनाथ देसाई हायस्कूल कॉर्नर गटार बांधणे. मालवण शहर पिंपळपार ते लौकिक हॉटेल ते मौनिनाथ मंदिर राजकोट किनारपट्टीपर्यंत अस्तित्वातिल गटारावर लादी बसवणे.यां दोन कमांसोबत मालवण गोडावून रस्ता ते सारस्वत बँक रस्ता येथे पावसाळी पाणी निचरा साठी दुतर्फा आरसीसी गटार बांधणे या कामाची सुद्धा सखोल तपासणी होणे आवश्यक आहे.
यांसह रेडकर हॉस्पिटल ते स्टेट बँक मार्गांवरील गटार कॉंक्रिटीकरण कामाबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करतं हे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सांगण्यात आले. या कामाची सुद्धा क्वॉलिटी निकृष्ट दर्जाची आहे. तरी या कामाची सुद्धा साईट व्हिजीट करून दर्जा तपासला जावा. असे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले. सक्त सुचना देउनसुद्धा बांधकाम विभाग कर्मचारी ठेकेदाराचे हित जोपासत शासनाचे नुकसान करत आहेत. तरी संबधित कामाची व अधिकारी वर्गाची सखोल चौकशी व्हावी. असेही बांधकाम सभापती यांनी स्पष्ट केले.

कामाची पाहाणी ; मुख्याधिकारी यांची भेट

बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांनी रेडकर हॉस्पिटल ते स्टेट बँक मार्गांवरील गटार कॉंक्रिटीकरण कामाची अधिकारी, ठेकेदार यांसह लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पाहाणी केली. त्या नंतर उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, स्वच्छता सभापती पुनम चव्हाण, नगरसेवक ललित चव्हाण यांसोबत मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांची भेट घेऊन निकृष्ट कामांची तक्रार केली. सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडिट होईल. त्या अगोदर सर्व कामांची तपासणी केली जाईल. असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.