मागासवर्गीय वस्तींचे नाव बदलण्याचा उपक्रम पूर्ण; सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा

 गिर्ये येथे धम्म मेळावा, बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना व विविध कार्यक्रम उत्साहात

देवगड तालुक्यातील गिर्ये येथे आयोजित धम्म मेळावा, बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना व जाहीर कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास पालकमंत्री Nitesh Rane, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष Dr. Bhimrao Yashwantrao Ambedkar, माजी मंत्री Vijay Girkar यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 

पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात मागासवर्गीय वस्तींची जातीवाचक नावे बदलण्याचा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण झाल्याचे सांगितले. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात असा उपक्रम राबवणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा असल्याचा उल्लेख त्यांनी केला. बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती व समाजकल्याण निधीतून सुमारे नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

डॉ. भीमराव आंबेडकर यांनी भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार-प्रसार समाजात अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली. थायलंडमधून आणलेल्या बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा उल्लेख करत त्यांनी बुद्ध धम्मातून समाजात समता, बंधुता व मानवतेचे विचार रुजविण्याचा संदेश दिला. सम्राट अशोक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच आरक्षण वर्गीकरण, जनगणना आणि समाजकल्याण निधी याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

 

माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर म्हणाले, “आम्ही उभ्या केलेल्या बुद्ध विहारांमध्ये वर्षाचे सर्व दिवस बुद्ध वंदना होते. गिर्ये गाव एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करीत आहे.” यावेळी सलग बुद्ध वंदना म्हणणाऱ्या तिघांचा सोन्याची नाणी व चांदी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डी. के. पडेलकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा बुद्धमूर्ती व संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.

 

या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर महाराष्ट्राचे माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर तालुक्याचे तहसीलदार आर.जे. पवार, गावचे सरपंच भूषण पोकळे डि.के पडेलकर

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळाचे अध्यक्ष दीपक नामदेव गिरकर, सचिव प्रशांत भिकाजी गिरकर, ग्रामीण अध्यक्ष संतोष भिकाजी गिरकर, ग्रामीण सचिव सचिन भालचंद्र गिरकर, पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा अनघा अनंत गिरकर, सचिव संजना संजय गिरकर, ग्रामीण अध्यक्षा आरती संतोष गिरकर, ग्रामीण सचिव अक्षता सिद्धांत गिरकर आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

धम्म मेळाव्यासाठी के. एस. कदम, सुर्यकांत साळुंके, मनोहर सावंत, उत्तम कांबळे, दिलीप वाडेकर, सत्यवान पेंढारकर, तसेच सल्लागार सदस्य अनिल पुरळकर, संजय कांबळे, सुनील कांबळे, किशोर कांबळे यांच्यासह महिला कार्यकारिणीतील कनिष्ठत तिर्लोटकर, अर्पिता साळुंखे, सुरभी पुरळकर, संजीवनी गिरकर, अश्विनी पडेलकर, ऐश्वर्या कांबळे, मनाली वाडेकर, प्रियंका कदम तसेच नमिता कांबळे, रश्मी पडेलकर, सुप्रिया कांबळे, तन्वी पडेलकर आणि करुणा कांबळे आदी कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.