सारस्वत बँकेचे ग्राहकांना आवाहन: डिजिटल बँकिंग फ्रॉडपासून सावध राहा, सुरक्षित राहा!

सावंतवाडी : प्रतिनिधी

वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या युगात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक, सावंतवाडी शाखेचे मॅनेजर सतीश वाळवे तसेच ॲड.नकुल पार्सेकर यांनी ग्राहकांना ऑनलाईन आर्थिक फसवणुकीपासून वाचवण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले आहे. डिजिटल बँकिंग करताना सुरक्षितता कशी बाळगावी, यासंदर्भात त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

आपला OTP, PIN, mPIN पासवर्ड किंवा कार्डचा CVV नंबर कधीही कोणासोबतही शेअर करू नका. SMS, ईमेल किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा. पैसे मिळवण्यासाठी कधीही QR कोड स्कॅन करावा लागत नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने पाठवलेला QR कोड स्कॅन करू नका.

तसेच अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईल/संगणकाची स्क्रीन शेअर करू नका किंवा कोणतेही अनोळखी ॲप्स डाऊनलोड करू नका.याशिवाय बँकेतून बोलत असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही संशयास्पद कॉलची आधी खात्री करून घ्या.बँकिंग व्यवहारांसाठी फक्त बँकेच्या अधिकृत ॲप्स आणि वेबसाईटचाच करा. तुमच्या खात्यातून कोणताही संशयास्पद व्यवहार झाल्यास त्याची माहिती तात्काळ बँकेला द्या. याशिवाय त्यांनी सांगितल्याप्रमाणे सारस्वत बँकेचे कोणतेही कर्मचारी ग्राहकांकडे कधीही त्यांचा OTP, PIN, Password किंवा CVV मागत नाहीत.

याशिवाय त्यांनी सायबर फ्रॉड झाल्यास काय करावे ह्याचे सुद्धा मार्गदर्शन केले .ऑनलाइन फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याची तक्रार नोंदवण्यासाठी तात्काळ सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधावा, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

यावेळी संबंधित बँकेचे ग्राहक ,ॲड.नकुल पार्सेकर, सारस्वत बँक सावंतवाडी शाखेचे मॅनेजर सतीश वाळवे तसेच बँक कर्मचारी उपस्थित होते.