राजापूर : प्रतिनिधी राजापूर शहरातील राजापूर बस डेपो तसेच बाजारपेठ परिसरामध्ये साडी परिधान केलेल्या ३ ते ४ संशयित महिला फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिला गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या पर्स तसेच पुरुषांच्या खिशातील पाकीट चोरी करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विशेषतः बसस्थानक, बाजारपेठ, दुकाने आणि गर्दीच्या भागात या महिलांची हालचाल दिसून येत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महिला अत्यंत सफाईदार पद्धतीने चोरी करत असून त्यांचा वावर ‘स्टॅन्डर्ड’ असल्याने सामान्य नागरिकांना सहज संशय येत नाही.
नागरिकांनी आपले मोबाईल, पर्स, पाकीट आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात. अनोळखी व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
राजापूर परिसरातील व्यापारी, प्रवासी आणि नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेऊन सतर्क राहावे, असेही सांगण्यात आले आहे.
– राजापूर पोलीस
Home महत्वाच्या बातम्या राजापूर बस डेपो व बाजारपेठेत संशयित महिलांची वर्दळ; नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे...













