समर्थ बागवे महाराज  पुण्यतिथी उत्सव 15 मे रोजी

मसुरे | झुंजार पेडणेकर :मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर येथील श्री समर्थ बागवे महाराज मठ येथे १५ मे रोजी

श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. सकाळी ८.०० ते १०.०० वा.पूजन, सकाळी ११.०० वा.

समर्थांच्या समाधीचे पूजन व अभिषेक,

दुपारी १२.०० वा.महाआरती,दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद,

सायं. ७.०० ते ९.०० वा.स्थानिक भजने,रात्री ठीक १०.०० वा.

वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ महान पौराणिक दशावतारी नाटक. उपस्थितीचे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थान, मसुरे यानी केले आहे.