रत्नागिरी : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाची विद्यार्थिनी सानवी श्रीकांत पेटकर हिची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कर्णबधिर विद्यालयातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत इस्त्रोसाठीची विशेष परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील सान्वी पेटकर ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. हा अभ्यास दौरा दिनांक १८ ते २३ मे या दरम्यान नियोजित करण्यात आला आहे. गतवर्षीही याच विद्यालयातील अनन्या रत्नदीप मूरकर हिचीदेखील इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती आणि तिने तो अभ्यासदौरा यशस्वीरित्या पूर्ण केला.
सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करीत आहेत, ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे. इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल सानवीचे दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष सौ. दाक्षायणी बोपर्डीकर आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी तसेच शाळेतर्फे मुख्याध्यापक गजानन रजपूत आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.













