नर्मदा आई महिला सहकारी संस्थेच्या मालवणी महोत्सवाचे झाले उद्घाटन
उद्घाटनाला सौ नीलमताई राणे, आमदार निलेश राणे यांची उपस्थिती
कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण होणारी उत्पादने आणि त्यांना बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठी नर्मदा आई महिला सहकारी संस्थेने मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून जो प्रयत्न केला आहे तो येथील रोजगार निर्मितीला चालना देणारा असल्याचे खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवांमध्ये सांगितले या महोत्सवाचे उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले.
नर्मदा आई महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सौ संध्या तेरसे यांनी कुडाळ येथे मालवणी महोत्सवाचे आयोजन केले आहे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते तर सिंधुदुर्ग शिक्षण संस्थेच्या सौ नीलमताई राणे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये झाले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संस्थेच्या अध्यक्षा सौ संध्या तेरसे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष कोरगांवकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, माजी सभापती मोहन सावंत, बंड्या सावंत, प्रसाद तेरसे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी सांगितले की हा उपक्रम सर्वांसाठी स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमांमधून व्यवसाय निर्माण होऊन त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे त्यामुळे व्यावसायिकांनी थांबून चालणार नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निर्माण होणारी उत्पादने ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गेली पाहिजे आणि अशा कार्यक्रमामधून व्यवसायिकांना पाठिंबा मिळतो आपला जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा आहे उद्योग धंदे कमी आहेत पण येथील लोकांनी उद्योगधंदे केले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तर आमदार निलेश राणे यांनी सांगितले की मालवणी महोत्सव हा आम्ही मुंबईमध्ये पाहतो पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा महोत्सव घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल कौतुक आहे येथील उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्याची काळाची गरज आहे अशा प्रकारचे महोत्सव भरवले गेले पाहिजेत यामधून आपल्या व्यवसायिकांना प्रेरणा मिळते तसेच रोजगार निर्मिती सुद्धा होते हा महोत्सव भरवल्याबद्दल सौ संध्या तेरसे यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.













