मळगांव घाटीलगत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

सावंतवाडी : मळगाव कुंभारवाडी येथील रहिवासी रामा लक्ष्मण शिरोडकर ( ६४ ) यांनी मळगाव घाटीलगत जंगल परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. नाना टेलर म्हणून ते परिचित होते. रात्री दहा वाजता त्यांचा मृतदेह आढळून आला. कालपासून ते बेपत्ता होते. याबाबत आज संध्याकाळी त्यांच्या नातेवाईकांनी सावंतवाडी पोलिसात खबर दिली होती. त्यानंतर त्यांचा शोध सुरू होता. रात्री मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत सावंतवाडी पोलिसात नातेवाईकांनी खबर दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.