चिपळूण (प्रतिनिधी): शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य ‘रिगल पब्लिक स्कूल (CBSE)’ ने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत इयत्ता १२ वी च्या परीक्षेत देदिप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल सलग चौथ्या वर्षीही १०० टक्के लागला आहे. विद्यालयाचा हुशार विद्यार्थी कु. सफवान फारुख म्हातारनाईक याने ९५.०४% गुण मिळवून शाळेत आणि संपूर्ण चिपळूण तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. या यशाबद्दल रिगल शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष संजय शिर्के व संचालक मंडळाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
विद्यालयाची निकालाची परंपरा: रिगल पब्लिक स्कूलने सलग ४ वर्षे १०० टक्के निकालाची आपली उज्ज्वल परंपरा या वर्षीही कायम ठेवली.
गुणवंत विद्यार्थी (टॉपर्स):
-
-
प्रथम: कु. सफवान फारुख म्हातारनाईक (९५.०४% – तालुक्यात प्रथम)
-
द्वितीय: कु. लायबा सय्यद खतीब (८६.२%)
-
तृतीय: कु. साश्वी मिश्रा (८५%)
-
तालुक्यात प्रथम आलेल्या सफवान म्हातारनाईक याने ‘जेईई मेन्स’ (JEE Mains) परीक्षेतही ९३.२३ पर्सेन्टाईल गुण मिळवून ‘जेईई ॲडव्हान्स’साठी पात्रता मिळवली आहे. तो भविष्यात आयआयटीयन्स (IITian) होण्याचे ध्येय बाळगून आहे. सफवान हा चिपळूणचे प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. फारुख म्हातारनाईक यांचा सुपुत्र आहे.
कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन या त्रिसूत्रीमुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले.
शाळेतील अनुभवी शिक्षक, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक लक्ष आणि आधुनिक अध्यापन पद्धती यामुळेच मुलांनी हे यश मिळवल्याची भावना ॲड. फारुख म्हातारनाईक यांनी व्यक्त केली.












