वेंगुर्ले विज वितरण कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारीही गैरहजर..

भाजप च्या शिष्टमंडळाने व्यक्त केला संताप..

वेळेत अधिकारी हजर न झाल्यास टाळे ठोकण्याचा दिला इशारा..

वेंगुर्ले : दाजी नाईक : पावसाळी परिस्थिती आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी गायब. पहिलाच पाऊस वेंगुर्ले तालुक्यात अनेक गाव अंधारात आहेत. वीज पुरवठा रात्री पासून खंडित झाला आहे, याबाबत तालुक्याचा आढावा घेण्यासाठी भाजप चे शिष्टमंडळ जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजप तालुका अध्यक्ष पपू परब, कमलेश गावडे, दाजी परब, तुषार साळगावकर यांनी भेट दिली. मात्र कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी ही नसल्याने उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान तत्काळ संबंधित अधिकारी हजर न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा लोकप्रतिनिधी यांनी दिला. सभापती कार्यालयात आले तर कोणच हजर नव्हते.