भिमराव आंबेडकर यांची राजापूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाला सदिच्छा भेट

राजापूर (वार्ताहर): भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांनी नुकतीच राजापूरला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे राजापूरातील बौद्ध समाज बांधवांनी उत्फुर्त स्वागत केले.
यावेळी त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जाऊन पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी आनंद युवक मंडळ राजापूरचे अध्यक्ष संजय जाधव यांनी भीमराव यशवंत आंबेडकर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सहकारी शिवजी बोराडे गुरुजी आणि लेणी संवर्धन युनिटचे सहकारी विनय जाधव (कुंभवडेकर) यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सिद्धांत नाना जाधव यांचा विशेष सत्कार श्री. आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पाठीवर शाबासकीची थाप देत पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची पाहणी करून श्री. आंबेडकर अत्यंत आनंदी झाले. या भवनामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केले. या संपूर्ण राजापूर दौऱ्याचे नियोजन आणि कार्यक्रमांचे प्रभावी आयोजन विनय कुंभवडेकर यांनी केले. यावेळी अनंत कांबळे, बौद्धचारी महेंद्र पवार, सत्यजित जाधव, संदेश जाधव, संजय जाधव आदी उपस्थित होते.