लांजा पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश राणे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गौरव

शासनाच्या ऑनलाइन देयक सेवेत नितेश राणे यांचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक

लांजा (प्रतिनिधी): शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाइन देयक सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नितेश राणे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते विशेष प्रशस्तीपत्र देऊन नुकताच गौरव करण्यात आला.
नागरिकांना विविध शासकीय सेवा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘आपले सरकार’ पोर्टल कार्यरत आहे. या पोर्टलवरील ऑनलाइन देयक सेवेची जबाबदारी सांभाळताना नितेश राणे यांनी कार्यतत्परता, सातत्य आणि अचूकतेला प्राधान्य देत प्रभावी कामगिरी केली. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राणे यांची राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या कामगिरी बद्दल रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कौतुक करत प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.

दरम्यान, नितेश राणे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.