चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील गोवळकोट, सहाणवाडी येथील रहिवासी कै. सुरेश पांडुरंग बांद्रे यांचे मंगळवार दि. १९ मे रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. दैनिक लोकमतचे चिपळूण येथील पत्रकार संदीप बांद्रे यांचे ते वडील होत. बुधवार दि. २० मे रोजी सकाळी ८ वाजता गोवळकोट स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.













