आ. किरण सामंत यांची वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट

 प्रशांत यादव आणि सौ. स्वप्ना यादव यांच्याकडून स्वागत

चिपळूण (प्रतिनिधी) : राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी आज सायंकाळी वाशिष्टी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी किरण सामंत यांचे स्वागत करून यथोचित सन्मान केला.
किरण सामंत यांनी यावेळी वाशिष्ठी डेअरीची पाहणी करून प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातून होणाऱ्या दूध संकलनाबाबतही त्यांनी जाणून घेत लांजा-राजापूरमधील दूध संकलनाचीही माहिती त्यांनी आवर्जून घेतली. यावेळी उद्योजक सचिन पाकळे, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, उमेश काटकर, विनोद झगडे, प्रसाद लाड, सिद्धेश ब्रिद व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वाशिष्ठी डेअरीचे संचालक महेश खेतले, अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, रमण डांगे, कु. स्वामिनी यादव, सरव्यवस्थापक लक्ष्मण खरात, व्यवस्थापक प्रदीप मगदूम,गणेश कदम,संदीप पाटील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.