प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; कोकण रेल्वेकडून अतिरिक्त डब्यांची मुदतवाढ

रत्नागिरी : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने काही गाड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वाढविण्यात आलेल्या अतिरिक्त डब्यांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा १ जून २०२६ ते २ जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.

 

कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गाडी क्रमांक १६५९५ / १६५९६ केएसआर बेंगळुरू – कारवार – केएसआर बेंगळुरू पंचगंगा एक्सप्रेस तसेच गाडी क्रमांक ०१५९५ / ०१५९६ कारवार – मडगाव जंक्शन – कारवार विशेष गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.

 

या गाड्यांमध्ये ३ टियर एसी इकॉनॉमीचे २, स्लीपरचा १ आणि जनरलचे २ असे एकूण ५ अतिरिक्त डबे जोडले जाणार असून गाडीची एकूण क्षमता १९ एलएचबी डब्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

 

गाडी क्रमांक १६५९५ केएसआर बेंगळुरूहून १ जून २०२६ ते १ जुलै २०२६ दरम्यान, तर गाडी क्रमांक १६५९६ कारवारहून २ जून २०२६ ते २ जुलै २०२६ दरम्यान अतिरिक्त डब्यांसह धावणार आहे.

 

तसेच गाडी क्रमांक ०१५९५ कारवार येथून आणि गाडी क्रमांक ०१५९६ मडगाव जंक्शन येथून २ जून २०२६ ते २ जुलै २०२६ या कालावधीत अतिरिक्त डब्यांसह चालविण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नर्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.